पहाटेचे चार वाजलेले. सारी चराचर सृष्टी निद्रित. संपूर्ण बिट्स सुद्धा शांतातेची झोप घेतय. काही उद्याच्या टेस्टसाठी भरपूर सारा अभ्यास करून थकलेले. तर काही आता अभ्यास होणे शक्य नाही असे कारण देउन रात्री ११ वाजताच ताणून दिलेले. सर्वत्र शांतता. पण तेवढया मध्ये एक आवाज येतो. राम भवन मधून. रूम नम्बर २७४ ते २७८. ट्यॅ ड्यँव!!! ट्यॅ ड्यँव!!! आणि न जाणे कित्येक प्रकारचे चित्रा विचित्रा आवाज!! कोण आहेत हे पठ्ठे? न उद्याच्या टेस्टचा अभ्यास करत आहेत न शांतपणे झोप घेत आहेत? मग काय करत आहेत हे महाभाग?
हे बिट्स मधले अशे वीर, जे त्यांच्या खुर्ची वर आसनस्थ होउना अथवा त्यांच्या शय्येमध्ये पाय पसरवून लोळत एक महान युद्ध खेळत आहेत. ज्यामध्ये न जाणे कित्येक हज़ार सैन्य मृत्युमुखी पडत आहे आणि कित्येक साम्राज्ये धुलीस मिलत आहेत. तर काही सम्राट स्वतःच्या मुकुटामध्ये मानाचा तुरा रोवत आहेत. आणि हे सम्राट दुसरे तिसरे कोणी नसून आपले निशाचर दोस्त, हारने वालो के बादशाह, King of the Losers. आणि हे युद्ध म्हणजे त्यांचे आराध्य दैवत Age Of Empires हा कंप्यूटर गेम.
या king of the losers चे अनुभव आणि त्यांच्या गमती जमती घेऊन येत आहेत सम्राट पेशवा उर्फ़ श्रीयुत सागर पिसाळ आणि सम्राट eterN1ty उर्फ़ श्रीयुत नृसिंह जवळगांवकर.
Friday, September 14, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
अरे वा! मला माहीत नव्हते तु एव्हढे चांगले मराठी लिहीत असशिल ते! छान! लगे रहो!
Thanx bro!!
Post a Comment