Monday, September 17, 2007

AOE मधील सम्राटांचा राज्याभिषेक सोहळा!!

हा राज्याभिषेक म्हणजे काही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रमाणे भव्यदिव्य सोहळा नसून स्वतःच स्वतःचा नामांतर करायचा एक प्रकार आहे (थोडक्यात बारस म्हणा ना!!!). हा एक विशेष चिंतनाचा, त्यांच्या (म्हणजे आपले king of the losers हो!) गर्वाचा आणि आत्मसन्मानाचा विषय आहे.

हे नाव ठेवण्यासाठी कुठलाही विषय वर्ज्य नाहीये. हे नाव लढाऊ विमानापासून ते ओढफुकंणीच्या विविध ब्रँड्स पर्यंत, आपल्या सन्माननिया राष्ट्रपतींपासून ते कुणा प्रसिद्ध (किंवा कुप्रसिद्ध) प्रक्षोभक ललनेपर्यंत, मद्यधुंद अवस्थेचे वर्णन करणारे, त्यांच्या आवडत्या सिनेमा कलाकाराचे, आवडत्या सिनेमाचे, कधी कधी rm, kr, W_clan, lp, Iam अशी सुरवात करून, पौराणिक अथवा ऐतिहासिक योद्धांचे, राजांचे आणि हुकुमशाहांचे अथवा एकमेकांच्या आई-बहिणीचा उद्धार करणारे असू शकते. क्वचितच हे नाव त्यांचे खरे नाव असते.

काही सम्राट त्यांच्या नाववर एवाढे काही ठाम नसतात. त्यांना काहीही नाव चालते. कारण त्यांचा मुख्य उद्देश हा युद्ध खेळणे हा असतो, किंवा ते नाव बदलाण्यास ते उत्सुक नसतात. तर काही जणांना त्यांच्या नावाचा अर्थ देखील माहीत नसतो. आणि हे अशे महान सम्राट युद्धकलेत देखील निपुण नसतात. त्यांना दुसरे काही काम नसते अथवा 'दुसरे','तिसरे' काम करून करून त्यांचे नको ते अवयव दुखायला लागतात तेंव्हा ते AOE कड़े वळतात.

काही सम्राट मात्र आपल्या ठरावीक नावांवर पक्के असतात. हे सम्राट त्यांच्या या कंप्यूटर जगतातील नावास अशी प्रसिद्धी मिळवून देतात की खर्या आयुष्यात सुद्धा तेच नाव प्रचलित होते. हे सम्राट खरेतर ब्रँड मँनेजमेंटच्या विद्यार्थ्यास एक उत्कृष्ट अशी केस स्टडी होत. काहीही धड येत नसताना सुद्धा एखाद्या क्षेत्रात नाव कसे कमवावे हे आपल्या नाकबहाद्दर हिमेशनंतर याच सम्राटांकडून शिकावे. या साहेबंची पद्धत बघा-->
कुठल्याही नवाशिक्या खेळाडूस चैलेन्ज द्यावयाचे "या रे कितीजणा येता ते!! एक एकाची खांडोळी करतो!! या तुम्ही सातजण, 1 on 7 हरवतो!! नाय हरवाला तर नाव बदलीन!!" आणि सोबत वरून पाचाशे रुपयांची शर्यत!!. बिचारे नवीन खेळाडू. करतात ते चैलेन्ज एक्सेप्ट. आणि मग काय विचारता? खानावळीमध्ये जेवणाच्या टेबलावर, भवनच्या प्रत्येक विंगमध्ये एकच चर्चा! लागलेल्या शर्यतीची आणि पाचाशे रुपयांची!! ही चर्चा खूप दिवस रंगते. पोरा एकमेकांना विचारत रहातात की सामना कधी आहे? पण आपले शर्यतबहाद्दर सम्राट टाळाटाळ करतात, कारणे देत बसतात की टेस्ट जवळ आली आहे अथवा आज नको आज मला दुसरे काम आहे वगैरे वगैरे. कारण सम्राटांचे काम झालेले असते. नवीन खेळाडूंमध्ये प्रसिद्धी मिळवायचे कार्य तडीस गेलेले असते आणि पैसेदेखील वाचतात. याला म्हणतात जाहिरातीमधला निपुण मनुष्य!! वादविवादाद्वारे फुकट प्रसिद्धी मिळवण्याच्या तंत्रामध्ये हिमेश देखील या मनुष्याचा हात पकडू शकणार नाही. वरुन ही जाहिरातबाजी कमी की काय म्हणून हा हीरो एक कॅप्शन देखील बनावतो "You try my level, you fail". पहा, परफेक्ट व्यावसाईक दृष्टिकोणाचा एक अस्सल नमूना!! तो एक ब्रँड बनून राहीला आहे बिट्समध्ये! या ब्रँड गुरूस माझा सलाम!!

3 comments:

Anonymous said...

Nice suspense...thought that it included almost all of us but then it all comes back to me...good blog....
And by the way ...please try to make this blog in English so that it would be easier to read...

Still hanging on to "You try my level,You fail "

Regards
ACB_Ethan

Saurabh said...

mast lihilay!

AoE kheltana vel kasa jato te kalatch nahi!

Even I used to play it like anything in my engineering days!

Please keep them coming!

Tapar said...

Thanx Ethan & bismarck!!
More will come out surely and in english now onwards.